माणसाच्या शरीरात जे अस्थीर कण असतात. त्यांना फ्री रॅडीकल्स म्हणतात. हे फ्री रॅडीकल्स माणसाच्या पेशींवर आक्रमण करतात, त्यांचे नुकसान करतात. या नुकसानीमुळे कँसर सारखे रोगही होतात.अँटी ऑक्सीडंटस या फ्री रॅडीकल्सशी एकरुप होऊन होणारे नुकसान कमी करतात. अँटी ऑक्सीडंट्स कुठे जास्त मिळतात? सर्व फळे व पालेभाज्या.
१. बीटा- केरोटीन- केशरी रंगाच्या सर्व फळांमध्ये तसेच भाज्यांमध्ये गाजर, पपया, आंबा, दुधी तसेच पालक व मेथी या पालेभाज्यांत.
२. ल्यूटीन- पालेभाज्यांत हे भरपूर प्रमाणात असते. डोळे निरोगी राखण्यास मदत करते.
३. लायकोपीन- हे फळांत असते. कलिंगड, टॉमेटो, पपया, पेरु व संत्रे यात जास्त असते.
४. व्हिटॅमिन 'ए'- गाजर्,दुध, लिव्हर, कणसे, पपया व इतर फळे.
५. व्हिटॅमिन 'सी'- सगळी आंबट फळे लिंबू, संत्रे तसेच कडधान्यात असते.
६. व्हिटॅमिन 'ई'- बदाम तेल , कॉर्न, सोयाबीन, आंबा व भा़ज्यांत असते.
कँसर, हार्टअटॅक, स्ट्रोक, अल्झमायर, डोळ्यांचे व त्वचेचे आजार या अँटी ऑक्सीडंटमुळे नियंत्रणात राहतात. |