3 G टेक्नॉलॉजी म्हणजेच थर्ड जनरेशन मोबाईल टेलेफोनी म्हणजेच थर्ड जनरेशन मोबाईल टेक्नॉलॉजी !
सेल्युलर तंत्रज्ञानाची आता तिसरी पिढी सुरु झाली आहे. ८० च्या दशकात AMPS ( Advanced Mobile phone Service ) च्या सेल्युलर नेटवर्कने या नेटवर्कची पहिली जनरेशन (पिढी)सुरु झाली. या दशकात FDMA ( Frequency Division Multiplexing Acess) चा वापर आवाज चॅनलवर ८०० मेगाहर्टझच्या तीव्रतेने पाठविण्यासाठी केला जाई.
९० च्या दशकात या तंत्रज्ञानाच्या दुसर्या पिढीने जन्म घेतला. CDMA म्हणजेच Code Division Multiple Acess ने एका चॅनेलवरुन ६४ कॉल्स ८०० मेगाहर्टझच्या तीव्रतेने केले जाऊ लागले.जगभरातल्या ऑपरेटर्सनी GSM म्हणजे Globle System for Mobile Communiation वापरायला सुरुवात केली; यात TDMA म्हणजे Time Division Multiple Acess ने प्रत्येक चॅनेलवरुन ८ कॉल्स ९०० ते १८०० तीव्रतेने मेगाहर्टझने ध्वनी अपेक्षित होऊ लागले. सध्याच्या दशकातील 3 G तंत्रज्ञानची व्याख्या इंटर्नॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनने अशाप्रकारे केली आहे.
१. हे तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देईल.
२.बॅडविड्थ वाढवेल.
३. अधिकाधिक वैविध्यपूर्ण काम करेल.उदाहरणार्थ जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त वेगाने पाठविणं आता शक्य होईल तसंच ह्या माहितीचं दृष्य प्रक्षेपण हे उत्तम दर्जाचं होईल.
४. वायरलेस टेलिफोन व्हिडीयो कॉल्स सहित.
५. ब्रॉडबॅन्ड डेटा उपलब्धता मोबाईलवर
६. मोबाईल कॉन्फरन्सेस घेता येतील
|