एक - एकाक्षरी मंत्र - ओम
दोन - शरिरातील महत्वाच्या सर्व अवयवांच्या जोड्या आहेत. डोळे दोन, कान दोन, हात दोन, पाय दोन वगैरे
तीन - शंकर त्रिनेत्र, संगीताची अंग तीन, गायन, वादन आणि नर्तन आपल्याकडे तीन गुण मानले जातात. सत्व, रज आणि तम गुण. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे तीन योग आहेत.
चार - चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद सध्या सुरु आहे कलियुग, त्याआधी होत कृतयुग, त्रेतायुग. द्वापारयुग आणि चौथं कैलियुग म्हणजे झाली चार युग आपल्याकडे चार आश्रम सांगितले आहेत. ब्रह्मचर्याश्रम, ज्यामध्ये गुरुगृही राहून ज्ञान, अध्ययन केल्ण जातं. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम हे चार आश्रम. वाद्य चार प्रकारची असतात. तंतूवाद्य, वायूवाद्य, धातूवाद्य आणि चर्मवाद्य.
पाच- पंचमहाभूतं कोणती. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. देवाला नैवेद्य दाखवतो पंचामृताचा. त्यात असतं दूध, दही, तूप, साखर आणि मध. आपल्याला एक श्लोक माहीत आहे का
आहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरेत नित्यम महापातक नाशनम I
अशा पंचकन्या. पाच इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय कान, नाक, त्वचा, डोळे, जीभ.
सहा- शाळेत असताना सगळ्यांना सहा ऋतुंची नाव पाठ करावी लागली असतीलच. शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म, वर्षा आणि ऋतुराज वसंत. सहा रस. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू आणि खारट. माणसाचे शत्रू सुद्धा सहा ज्यांच्यावर विजय मिळवणं कठीण काम, क्रोध, मत्सर, मद, मोह, लोभ असे षडरिपू.
सात- सप्तसूर. सारेगमपधनीसा सर्वांना माहीत आहेतच. आकाशातलं इंद्रधनुष्य सात रंगानीच बनलेलं असतं. व्यास, वाल्मिकी, विश्वामित्र, वाशिष्ठ, दधिची, अगस्ती आणि अत्री सप्तर्षी ही माहीत असतील.
आठ - आठ म्हटल्यावर सर्वप्रथम आठवतात. अष्टविनायक प्रत्येकाचं श्रध्दास्थान त्याचा महिमा प्रत्येकजण जाणतो.
शास्त्रीय नृत्यकलेत भरतमुनींनी अष्टनायिका सांगितल्या आहेत. त्यांची नावे अभिसारिका, खंडीता, विप्रलब्धा, उत्कंठा, स्वाधिनपातिका, वासकसज्जा, कलहान्तारिता आणि प्रोषितभर्तृका.
नऊ- नवरत्नांची वेगळी ओळख सांगायला नकोच. हिरा, पोवळ, पाचू, माणिक, गोमेद, पुष्कराज, नील मोती अकबर बिरबलाच्या गोष्टी सर्वांनी लहानपणी वाचल्या असतील त्याच अकबराच्या दरबारात असणार्या नवरत्नांबद्दल तुम्ही वाचलं असेलच. त्यात बिरबल आणि तानसेन ही नावं आपण ओळखतो. इतर नावं अबूल फजल, अबूल फैजी, राजा तोरडमल, पन्हा भांड कवि, गंगाभट, संस्कृत तज्ज्ञ कवि जगन्नाथ पंडीत नऊ रस नवग्रह आहेत.
दहा - दहा दिशा आहेत. पृथ्वीवर असूरांचा नाश करण्यासाठी विष्णूने अवतार धारण केले ते सुध्दा दहा, ज्यांना आपण दशावतार म्हणतो.