sachinbhandare - बँकिंग
 

Contact
sachin
time pass
marathi newspaper
websites
Career
आरोग्य
बँकिंग

अगदी आतापर्यंत बँकिंग व्यवस्था आणि सरकारी कार्यालयं यात फारसा फरक नव्हता. कार्यालयाच्या रचनेपासून ते कर्मचाऱ्यांच्या वागणुकीपर्यंत सगळा खाक्या सरकारीच असायचा. सध्या मात्र आíथक क्षेत्रात होणारी सुधारणा आणि माहिती तंत्रज्ञानामुळे बँकिंगचा चेहरामोहराच बदलत आहे. बँकांची कार्यालयं तर वातानुकूलित आणि मॉडर्न होत आहे तच. पण आपल्या मॉडर्न ग्राहकांसाठी बँका ए.टी.एम., डेबिट-क्रेडिट कार्डस, इंटरनेट बँकिंग, टेलि बँकिंग अशा विविध सुविधा देऊ लागल्या आहेत.

परदेशी बँकांची कार्यक्षमता आणि जागतिकीकरण याला तोंड देण्यासाठी भारतातील बँकिंग क्षेत्र सज्ज होत आहे.
वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे लक्ष देत पारंपरिक बँकिंग व्यवहाराबरोबरच कॉर्पोरेट बँकिंग, र्मचट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, ट्रेझरी, फोरेक्स यासारख्या क्षेत्रांवरही बँका आपलं लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्यांना आज बँकिंगमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था आहे. ही बँक व्यावसायिक बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं व देखरेखीचं काम करतं. रिझव्‍‌र्ह बँक वित्तसंस्थांसाठी व बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वं व कार्यवाहीच्या सूचना वेळोवेळी देत असते. भारतामध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसंच एक्झिम बँक व नाबार्ड सारख्या विशेष क्षेत्रात काम करणाऱ्या बँका आहेत. याचप्रमाणे आय.सी.आय.सी.आय., आय.डी.बी.आय. सारख्या वित्तसंस्था बँकिंग क्षेत्रात आघाडीवर आहेत.
बँकिंगमधील संधी
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये (उदा.स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र) प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून निवड स्पर्धा परीक्षेद्वारे (लेखी परीक्षा व मुलाखत) केली जाते. कोणत्याही शाखेतील पदवीधर या परीक्षा देऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियासाठी २८ र्वष वयोमर्यादा आहे. तर अन्य राष्ट्रीयीकृत बँकांसाठी २६ र्वष वयोमर्यादा आहे. क्लेरिकल(कारकुनी) पदांसाठी व अन्य पदांसाठी स्थानिक वर्तमानपत्रं व एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात दिली जाते.
खाजगी बँका तसंच परदेशी बँकामधील भरतीसंदर्भात जाहिरात अग्रगण्य वर्तमानपत्रांतून दिली जाते. व्यवस्थापन विभागातील पदांसाठी मॅनेजमेंट संस्थांकडून कॅम्पस इंटरह्यू घेऊन उमेदवार निवडले जातात. लॉ, इंजिनीयिरग, कृषी आदी विषयांतील पदवीधरांनादेखील विविध बँकांमध्ये मॅनेजमेंट विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
अभ्यासक्रम
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट(पुणे)

१९६९ मध्ये भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने (एन.आय.बी.एम.) या संस्थेची बँकिंग फायनान्स विषयातील संशोधन, प्रशिक्षण व सल्ला देण्यासाठी स्थापना केली. स्वायत्त संस्था म्हणून केवळ भारतातील अर्थजगतात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संस्थेचा नावलौकिक आहे.
या संस्थेतर्फे एक वर्षांचा पोस्ट ग्रज्युएट प्रोग्रम इन बँकिंग एॅण्ड फायनान्स (पी.जी.पी.बी.एफ.) हा अभ्यासक्रम चालवला जातो. बँकिंग व फायनान्स क्षेत्राला आवश्यक असलेलं विश्लेषण कौशल्य व दृष्टिकोन या अभ्यासक्रमाद्वारे विकसित केला जातो. प्रशिक्षित उमेदवारांना बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या घेण्याच्या दृष्टीने तयार केलं जातं. महत्त्वाच्या राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका तसंच वित्त संस्थांना कॅम्पस इंटरह्यूसाठी आमंत्रित केलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वानाच याद्वारे १०० टक्के प्लेसमेंट मिळाल्या आहेत.
पात्रता
भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के गुण मिळवणारे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.
प्रवेश प्रक्रिया
या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आय.आय.एम.च्या कॅट(कॉमन एॅडमिशन टेस्ट)ला बसणं आवश्यक आहे. कॅटच्या मार्कावर उमेदवारांना ग्रूप डिस्कशन व मुलाखतीसाठी बोलावलं जातं. एन.आय.बी.एम.कडे प्रवेशासाठी स्वतंत्र फॉर्म भरावा लागतो.
संपर्क
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट,
कोंढवे खुर्द, पुणे-४११०४८.
दूरध्वनी ०२०-२६८३१५८४
वेबसाईट www.nibmindia.org
फायनान्स
१९९१मध्ये भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. भारताच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नातील सेवाक्षेत्राचा वाटा २००३-०४ मध्ये ५१ टक्के एवढा झाला आहे. या सेवा क्षेत्रात फायनान्स क्षेत्राशी संबंधित सेवांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. फायनान्स क्षेत्रात प्रामुख्याने बँका, विमा कंपन्या, शेअरबाजार, वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, डिपॉझिटरी, एॅक्चुरिअल सेवा इत्यादींचा समावेश होतो. या क्षेत्रात करियरच्या दृष्टीने पुढील संधी उपलब्ध आहेत.
१) कॉर्पोरेट फायनान्स
० बजेटरी कंट्रोल
० कॅशफ्लो प्लॅिनग
० फंड्स मॅनेजमेंट
० बँकिंग एॅण्ड लायझिनग विथ फायनान्शियल इन्स्टिटय़ूटस
२) इन्शुरन्स
० हेल्थ
० लाईफ
० प्रॉपर्टी
० कॅज्युअल्टी
० एॅसेट मॅनेजमेंट
० रिस्क मॅनेजमेंट
३) इन्व्हेस्टमेंट बँकिंग
० मर्जर्स एॅण्ड एॅक्वेझिशन
० डेरिव्हेटिव्हज्
० म्युच्युअल फंड्स/ फंड अकाऊंट
० ट्रेझरी मॅनेजमेंट
४) कमíशयल बँकिंग
० ट्रेड क्रेडिट
० लििझग
० इंटरनॅशनल फायनान्स
५) रिटेल बँकिंग
० ब्रँच बँकिंग
० डिपॉझिट प्राडक्ट्स
० टेलर सíव्हसेस
० लायबिलिटीज्
० क्रेडिट कार्डस
० मायक्रो फायनान्स
० फायनान्शियल प्लॅिनग
ट्रेझरी मॅनेजमेंट
ट्रेझरी मॅनेजर कंपनीमध्ये जमा होणारी वा खर्च होणारी रोख रक्कम(कॅश) हाताळत असतो. कंपनीकडे असलेली रोख रक्कम कुठे गुंतवायची, याचा निर्णय ट्रेझरी मॅनेजर घेतात. त्याचप्रमाणे रोख रक्कम लागल्यास कॅपिटल मार्केटमधून किंवा अन्य कोणत्या मार्गाने रक्कम मिळवायची याचाही विचार ट्रेझरी मॅनेजर्स करतात. ट्रेझरी मॅनेजर्स प्रामुख्याने कॉर्पोरेट क्षेत्र व बँकांमध्ये असतात. बँकांमध्ये ट्रेझरी मॅनेजमेंटचा वेगळा विभाग असतो. खाजगी कंपन्यांमध्ये काही ठिकाणी स्वतंत्र विभाग असतात. तर काही ठिकाणी फायनान्स विभागाअंतर्गत ट्रेझरी मॅनेजमेंटचं काम येतं. कॉर्पोरेट फायनान्समध्ये ट्रेझरी मॅनेजमेंटकडे बचत व गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुकूल निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाहिलं जातं. तर बँकांमध्ये ट्रेझरी मॅनेजमेंट हे नफा मिळवण्याचं केंद्र आहे.
कंपन्या जास्तीत जास्त पसे मिळवत असल्याने कॉर्पोरेट फायनान्समध्ये ट्रेझरी मॅनेजरचं काम अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मोठमोठय़ा कंपन्या ट्रेझरी मॅनेजमेंटला कामाच्या दृष्टीने महत्त्व देत असल्याने या क्षेत्रात तज्ञ लोकांची मागणी वाढत आहे. सर्वसाधारणपणे फायनान्स विषयातील एम.बी.ए. खाजगी कंपन्यांमध्ये ट्रेझरी मॅनेजमेंटचं काम करतात. ट्रेझरी मॅनेजर्सना फायनान्समध्ये इतर विभागात काम करणाऱ्यांपेक्षा २० ते ३० टक्के जास्त पगार मिळतो.
कंपनी सेक्रेटरी(सी.एस.)
कंपनी कायद्यानुसार मोठय़ा कंपन्यांना (ज्यांचं शेअर कॅपिटल पाच कोटींहून अधिक आहे.) कंपनी सेक्रेटरीची नेमणूक करणं बंधनकारक आहे. त्याहून लहान कंपन्यांना कंपनी कायद्यानुसार, काही बंधनं आहेत. त्यातील एक म्हणजे या कंपन्यांनी कंपनी कायद्यातील विविध तरतुदींची पूर्तता केली आहे वा नाही याचं प्रमाणपत्र रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे द्यावं लागतं. हे प्रमाणपत्रं नोंदणीकृत कंपनी सेक्रेटरीचंच असावं लागतं. चार्टर्ड अकाऊंटंट ज्याप्रमाणे वित्तीय ऑडिट करतात तसंच कंपनी सेक्रेटरी कायदेशीर ऑडिट करतात.
परीक्षा
कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचं सदस्यत्व घ्यावं लागतं. त्यासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचं स्वरूप (अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत) विद्यापीठीय परीक्षेहून बरंच भिन्न असल्याने अनेकांना ती कठीण वाटते. अभ्यासक्रम तीन भागांत विभागलेला असून ती परीक्षा दोन टप्प्यांत देता येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 15 महिन्यांचं प्रशिक्षण बंधनकारक असतं.
रोजगार संधी
सी.एस. म्हणून वर उल्लेख केल्यानुसार, मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरी करता येते. किंवा खाजगी व्यवसायही करता येतो. खाजगी व्यवसायात वित्तीय व कायदेशीर सल्ला विविध कंपन्यांना देणं, सेबीच्या नियमांनुसार शेअर्ससंबंधी ऑडिट करणं अशा गोष्टींचा अंतर्भाव होतो. खाजगी कंपन्यांव्यतिरिक्त कॅपिटल मार्केट, सेबी, स्टॉक एक्स्चेंज इत्यादीमध्येही सी.एस.ना मागणी असते. याशिवाय कॉमर्स, कायदा तसंच व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये शिकवण्याची संधीही मिळू शकते.

अभ्यासक्रम
फायनान्समध्ये करियर करण्यासाठी विविध विद्यापीठांमधील खालील अभ्यासक्रम करणं उपयुक्त ठरेल.
० मास्टर इन बिझनेस एॅडमिनिस्ट्रेशन(फायनान्स)
० मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स(फायनान्स)
० मास्टर ऑफ फायनान्स एॅण्ड कंट्रोल
० मास्टर ऑफ कॉमर्स (बिझनेस एॅडमिनिस्ट्रेशन)
० मास्टर ऑफ आर्ट्स (बिझनेस इकॉनॉमिक्स)
० पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट

संस्था
इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया
(मुंबई विभागीय कार्यालय)
१३, जॉली मेकर चेंबर्स, क्र.२, नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१.
दूरध्वनी ०२२-२२०२१८२६/२२८४४०७३
वेबसाईट www.icsi.edu
http://www.icsi.edu
अकाऊंटिंग व फायनान्समध्ये करियर करण्यासाठीचे विविध शैक्षणिक मार्ग
आय.आर.डी.ए. (इन्शुरन्स परीक्षा)-बँका व इन्शुरन्स  कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
एम.बी.ए. - फायनान्समध्ये नोकरीच्या संधी
सी.एफ.ए. (चार्टर्ड फायनान्शियल एॅनॅलिस्ट)
सी.एस (कंपनी सेक्रेटरी)
सी.ए. (चार्टर्ड अकाऊंटंट)
सी.डब्ल्यू.ए. (कॉस्ट एॅण्ड वर्क्‍स अकाऊंटंट)
वरील शिक्षण पूर्ण केल्यावर अकाऊंटिंग, ऑडिटिंग, कॉर्पोरेट फायनान्स,  फायनान्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
संबंधित वेबसाईट्स

सी.ए. - चार्टर्ड अकाऊंटंट www.icai.org/new_category.html
सी.एस.- कंपनी सेक्रेटरी www.icsi.edu
सी.डब्ल्यू.ए.- कॉस्ट एॅण्ड वर्क्‍स अकाऊंटंट www.myicwai.com
सी.एफ.ए.-चार्टर्ड फायनान्शियल एॅनॅलिस्ट www.cfainstitute.org
आय.आर.डी.ए.- इन्शुरन्स रेग्युलेटरी एॅण्ड डेव्हलपमेंट एॅथॉरिटी www.irdaindia.org

बँकिंग क्षेत्र हे असं वटवृक्षासारखं विस्तारित आहे. त्यातली कुठली शाखा आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा निर्णय घेऊन त्यानुसार निवड करता येईल.


Today, there have been 4 visitors (6 hits) on this page!
 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free