मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१० आधुनिक युगात उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मानव संसाधन तयार करुन देण्याच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात नामवंत असलेल्या महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने बी.एससी (इंडस्ट्रीयल सायन्स) अभ्यासक्रम तयार केला आहे.
करारानुसार कंपनीच्या तज्ज्ञांव्दारे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी.एस.सी(इंडस्ट्रीयल सायन्स) अभ्यासक्रम तयार करण्यात आला. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याना औद्योगिक क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान, कामकाजाची पध्दती, तांत्रिक माहिती देण्यात येईल.
कंपनीच्या परिसरातील अभ्यासकेंद्रात पहिल्या वर्षी मॅन्युफॅक्चरिंग, दुसर्या वर्षी इंटर्नशिप, तर तिसर्या वर्षी प्रोफेशनल कॉम्पेन्टसीच्या माध्यमातून २७ विषय शिकविण्यात येतील.
तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी बारावी तर एका वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
यासाठी केवळ आठ हजार रुपये प्रतिवर्ष असे शुल्क आकारण्यात येईल.
मात्र, अभ्याक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये महिना वेतन देण्यात येईल. ज्यातून शुल्क भरता येणे शक्य होईल.
पहिल्या टप्प्यात शंभर विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येणे शक्य होईल.
राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपनीशी करार करुन तयार करण्यात आलेला पहिलाच अभ्यासक्रम आहे.
आगामी वर्षापासून अभ्यासक्रमास सुरवात करण्यात येईल.
तंत्रशिक्षण पदविका व अभियांत्रिकी पदवी करणार्या विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता येणेही शक्य होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणानंतर योग्य भविष्य निवडता येणे शक्य होईल.
बी.एस. सी (इंडस्ट्रीयल सायन्स) पदवी :
• प्रथम वर्ष- इंट्रोडक्शन टु मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग, इंव्हेंटरी मॅनेजमेंट, जॅपनिज मॅनेजमेंट टेक्नीक, कॉस्टिंग ऍण्ड कॉस्ट अकाउंटिग, क्वॉलिटी ऍशुरन्स, इनव्हॉयर्नमेंट.
• व्दितीय वर्ष- अचिव्हमेंट मोटिव्हेशन, प्रोजेक्ट आयडेंटीफिकेशन, प्रोजेक्ट फायनान्स, मार्केट ऍनॅलॉसिस, लिडराशिप ऍण्ड टिम ब्लिडींग, फायनान्स ऍण्ड कॉस्ट अकाउंटिग, इंडस्ट्रीअल ऍण्ड लेबर लॉ व्हॅल्सुव्ह, ऐथिक, इन बिझनेस, हेल्थ, सेफ्टी, ऍण्ड इनव्हॉयर्नमेंट.
• तृतीय वर्ष- क्वांटिटिव्ह ऍप्टीटयुड, कॉम्पिटेटिव्ह 'सी ' प्रोग्राम, ग्रुप डिस्कशन, ऍण्ड ग्रुप कम्युनिकेशन, ऍनॉलिटक अबिलीटी, लॉजीकल सिरोनिंग, पर्सनल इंटरव्हु टेक्नीक, लिडरशिप ऍण्ड टिम ब्लिडींग, स्वॉट ऍनॅलॉसिस ऍण्ड करिअर प्लॉनिंग, बिझनेस प्रेझेंटेशन स्कील.