sachinbhandare - दहावीनंतरचे डिप्लो
 

Contact
sachin
time pass
marathi newspaper
websites
Career
=> दहावीनंतरचे डिप्लो
=> शैक्षणिक कर्जासाठी
=> दहावी, बारावी, पदवीधरांसाठी सुरक्षा दलात ह
=> युपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा
=> तरुणांनो, चला, जिंकू या दाही दिशा...
आरोग्य
बँकिंग

दहावीनंतर ‘पॉलिटेक्निक’ प्रवेशाची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष (२००८-०९) पर्यंत संस्थास्तरावर स्वतंत्रपणे संस्थानिहाय व्हायची, त्यामुळे विद्यार्थी व पालकांना पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रत्येक इच्छित संस्थेमध्ये जाऊन तेथील प्रवेश प्रक्रियेचे ‘अग्निदिव्य’ पार करावे लागत असे. बरेचदा एकाच दिवशी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संस्थांची ‘प्रवेश घेण्याची’ वेळ असायची, त्यामुळे विद्यार्थी व पालकांची त्रेधातिरपिट उडायची व प्रसंगी चांगले गुण असूनदेखील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असे. शिवाय संस्थानिहाय माहिती पुस्तक व अर्ज घेण्याचे शुल्क व प्रमाणपत्रांच्या प्रती इ.वर भरपूर पैसा व वेळ खर्च होत असे. या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्यासाठी व पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तसेच शासनाकडे तगादा असायचा. अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेप्रमाणे अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) स्तरावरदेखील एकत्रितरीत्या सर्व संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने विचारमंथन सुरू झाले व त्याचा परिपोष म्हणून शैक्षणिक वर्ष (२००९-१०) पासून एकत्रित प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व इच्छुक विनाअनुदानित संस्थांनी एकत्रितपणे प्रवेश प्रक्रिया राबविली.
सर्व शासकीय तंत्रनिकेतनने, सर्व अनुदानित संस्था व इच्छुक अशासकीय (विनाअनुदानित) संस्थांनी या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग दिला. शैक्षणिक वर्ष (२०१०-११) मध्येदेखील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सामायिकपणे राबविली जाणार आहे. मागील वर्षांपेक्षा अधिक संख्येने अशासकीय संस्था सामायिक प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवीत आहेत- प्रत्यक्ष सहभागी होत आहेत.
प्रवेश प्रक्रियेचा संक्रमण काल असल्यामुळे सदर प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाताना प्रत्येक विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व बाबींचा सूक्ष्मपणे विचार करणे गरजेचे आहे. संस्थांचे शुल्क, अभ्यासक्रम, स्तर, मान्यता, अभ्यासक्रमाची वेळ (सेकंड शिफ्ट संस्थांच्या बाबतीत), अल्पसंख्याक (धार्मिक/ भाषा इ.), दर्जा इ. बाबींचा विशेष करून अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याशिवाय विशिष्ट संस्थांकडे उपलब्ध असलेल्या व्यवस्थापन कोटय़ासंदर्भात (मॅनेजमेंट जागा) संबंधित संस्थांकडून माहिती करून घेणे गरजेचे आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत असणाऱ्या सर्व पॉलिटेक्निक संस्थांची माहिती तसेच संस्थेमध्ये असणारे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, दूरध्वनी क्र., संकेत स्थळ इ. सर्व बाबींची माहिती महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध (www.dte.org.in/poly2010) आहे. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संस्थेतील अभ्यासक्रम व संबंधित अधिक माहिती (www.msbte.com) मिळू शकेल.
तसेच कोणत्याही पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेताना त्या पॉलिटेक्निकमधील संबंधित विद्याशाखा अथवा अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (ए.आय.सी.टी.ई.) यांची मान्यता असल्याची खातरजमा करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)
तंत्रनिकेतन अर्थातच पॉलिटेक्निक म्हणजे प्रामुख्याने दहावीनंतरचे डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रम/ प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या संस्था. डिप्लोमा अभ्यासक्रमाचा कालावधी साधारणत: तीन वर्षांचा असतो. काही संस्थांमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा (उदा. इंटेरिअर डिझाइनिंग) तर काही संस्थांमध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम (सॅण्डविच पॅटर्न) असतो. चार वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये साधारणत: एक वर्षांचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग (प्रत्यक्ष कामाचा अनुभव) प्रदान करण्याचे प्रावधान असते.
शासकीय संस्था, अनुदानित संस्था, विनाअनुदानित संस्था, 
स्वायत्त संस्था, अल्पसंख्याक संस्था इ. विविध प्रकार संस्था वर्गवारीमध्ये आढळतात. महाराष्ट्रात एकूण ३०० पेक्षा जास्त तंत्रनिकेतने असून ४० शासकीय, १६ पेक्षा जास्त अनुदानित व २४० पेक्षा जास्त विनाअनुदानित संस्था आहेत.
दहावीनंतर डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेशेच्छुक उमेदवाराला एस.एस.सी. अथवा समकक्ष परीक्षेमध्ये किमान एकत्रित ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील मागास प्रवर्गातील उमेदवाराला किमान एकत्रित ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. जनरल सायन्स/ फिजिक्स व केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स (अलजेब्रा व जॉमेट्री) आणि इंग्रजी या विषयासह प्रत्येक संवर्गासाठी किमान टक्केवारीची अट लागू 
आहे. सन्माननीय न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे निर्णय तसेच शासनाचे संबंधित अध्यादेश/ निर्णय इ. बाबींवर सातत्याने दक्षतापूर्वक
लक्ष देऊन उपरोक्त बाबतीत (जर काही बदल असतील त्याचा) परामर्श घेणे उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
संबंधित प्रवेश प्रक्रियेचे माहितीपुस्तक २५ जूनपासून अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट सेंटर (ए.आर.सी.)मधून प्राप्त केले जाऊ शकते. संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रभर ८८ पेक्षा जास्त ए.आर.सी.ची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी १६ पेक्षा जास्त ए.आर.सी. मुंबई विभागात आहेत.
संबंधित सर्व माहिती www.dte.org.in/poly2010 या संकेतस्थळावर दिलेली आहे.
निवडक ए.आर.सी. खालीलप्रमाणे 
१) शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलीयावर जंग मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई- ५१.
२) एम.एच. साबुसिद्दीक तंत्रनिकेतन, साबुसिद्दीक पॉलिटेक्निक रोड, भायखळा, मुंबई-०८.
३) के. जे. सोमय्या तंत्रनिकेतन, विद्याविहार, मुंबई.
४) गव्हर्न्मेंट इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, डॉ. डी. एन. रोड, मुंबई.
५) शासकीय तंत्रनिकेतन, पुणे विद्यापीठ रोड, पुणे.
६) शासकीय तंत्रनिकेतन, विद्यानगर, कोल्हापूर.
७) शासकीय तंत्रनिकेतन, समनगाव रोड, नाशिक.
८) शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, औरंगाबाद.
९) शासकीय तंत्रनिकेतन, सदर, नागपूर.
१०)शासकीय तंत्रनिकेतन, गाडगेनगर, अमरावती. 
अभियांत्रिकीच्या विद्याशाखा 
पॉलिटेक्निक संस्थांच्या माध्यमातून डिप्लोमा स्तरावरचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या सुमारे ५५ पेक्षा जास्त अभियांत्रिकीच्या विद्याशाखा आहेत. साधारणत: प्रत्येक संस्थेमध्ये किमान तीन विद्याशाखा आहेत. कमाल विद्याशाखा साधारणत: सात ते आठ इतक्यादेखील असू शकतात. निवडक विद्याशाखा खाली दिलेल्या आहेत.
० सिव्हिल इंजिनीअरिंग
० मेकॅनिकल इंजिनीअरिंग
० इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
० कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
० इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
० केमिकल इंजिनीअरिंग
० ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग
० इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
० प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
० फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी
० इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग
० गारमेंट टेक्नॉलॉजी
० टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी
० लेदर टेक्नॉलॉजी
० इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन
इ. सुमारे ५५ पेक्षा जास्त विद्याशाखा आहेत. उपरोक्त विद्याशाखांव्यतिरिक्त अनेक नवनवीन विद्याशाखा उदयास येत आहेत. संबंधित विद्याशाखांची माहिती (www.msbte.com) या संकेतस्थळावर मिळू शकेल.
विकल्प अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरणे 
कॅप राऊंड १, कॅप राऊंड २, कॅप राऊंड तीन व कौन्सिलिंग राऊंड असे एकूण चार राऊंड आहेत. प्रत्येक वेळी नव्याने विकल्प अर्ज भरावयाचा आहे. विकल्प अर्जामध्ये उमेदवाराने निवडलेले संकेतांक अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने भरावयाचे आहेत. विभाग, संस्था व अभ्यासक्रम या तिन्ही बाबींचा मिळून एक विकल्प तयार करावयाचा असतो. प्रत्येक वेळी किमान एक विकल्प अर्ज भरणे गरजेचे असते. विकल्प अर्ज भरण्यापूर्वी संबंधित ए.आर.सी.कडे शंकानिरसन करून घेणे गरजेचे आहे. पहिले तीन राऊंड (एक, दोन व तीन) अलॉटमेंट पद्धतीचे असून चौथा राऊंड शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे कौन्सिलिंग पद्धतीने होणार आहे.

उपरोक्त प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश निश्चित करण्यासाठी ए.आर.सी.मध्ये जाऊन मूळ कागदपत्रांसह आवश्यक शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे.
प्रथम फेरीमध्ये कमाल ४५ विकल्प, दुसऱ्या फेरीमध्ये ४५ विकल्प व तिसऱ्या फेरीमध्ये कमाल ४५ विकल्प अशी कमाल मर्यादा आहे तर किमान एक तरी विकल्प प्रत्येक फेरीमध्ये भरणे आवश्यक आहे. संबंधित बाबतीत अद्ययावत माहिती अधिक तपशीलवारपणे माहिती पुस्तिकेत दिली आहे.
जिल्हा परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ७०टक्के जागा तर बाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३०% जागा अशी विभागणी आहे. तांत्रिक/ व्यावसायिक विषयासह दहावी उत्तीर्णासाठी १५% जागांची तरतूद आहे. सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे कॅप राऊंडमध्ये नसलेल्या अर्थातच सामायिक प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट न झालेल्या संस्था तसेच अल्पसंख्याक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधित संस्था स्तरावर राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबतीत स्वतंत्रपणे अर्ज करणे गरजेचे असते. अशा संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व निकष अतिशय काळजीपूर्वक समजणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, ३ महापालिका मार्ग, मुंबई- ४००००१ येथे संपर्क करावा. 
दूरध्वनी- ०२२- ३०२३३४४४/ ४५/ ४६. 

अर्ज करण्याची पद्धत
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून पॉलिटेक्निक प्रवेश पत्रक अधिसूचना प्रसारित केली जाते. त्याला अनुसरून ए.आर.सी. केंद्रांमधून विहित मुदतीत माहिती पुस्तक प्राप्त केले जाऊ शकते. माहिती पुस्तकासोबत अ‍ॅप्लिकेशन किट दिली जाते. प्रत्येक अ‍ॅप्लिकेशन किटमध्ये विशिष्ट ‘लॉ इन आयडी व पासवर्ड’ भरण्याचे प्रावधान असते. संगणक अथवा इंटरनेटचे पुरेसे ज्ञान नसलेल्या उमेदवारांसाठी संबंधित ए.आर.सी.च्या तज्ज्ञांकडून अर्ज भरण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले जाते.
पात्र उमेदवाराने ऑनलाइन प्रवेश अर्ज संगणकावर http://www.dte.org.in/Poly2010 ; या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती बिनचूक भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट घ्यायची आहे. त्यावर सही करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सदर प्रिंट आऊटसोबत अनुक्रमे जोडाव्यात. ए.आर.सी. सेंटरमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांची सत्यता पडताळून घ्यावी. या वेळी ओरिजनल प्रमाणपत्रांची जंत्री सोबत असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेश अर्जाची पोच झाल्याची खात्री ए.आर.सी.मधून करून घ्यावी.
प्राप्त अर्जाची संगणकाद्वारे छाननी केल्यानंतर ‘प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट’ संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल. त्यातील त्रुटी (असल्यास) दूर करून अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर सादर करण्यात येईल. सदर गुणवत्ता यादीच्या आधारे विविध प्रवेशाच्या ‘फेरी’ घेण्यात येणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी ‘टय़ुशन फी वेव्हर स्कीम’ (TFWS) ची माहिती घ्यावी.
Today, there have been 2 visitors (3 hits) on this page!
 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free