sachinbhandare - युपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा
 

Contact
sachin
time pass
marathi newspaper
websites
Career
=> दहावीनंतरचे डिप्लो
=> शैक्षणिक कर्जासाठी
=> दहावी, बारावी, पदवीधरांसाठी सुरक्षा दलात ह
=> युपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा
=> तरुणांनो, चला, जिंकू या दाही दिशा...
आरोग्य
बँकिंग

कोणत्याही स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी, पूर्वनियोजन आवश्यक असते. जर ऐनवेळी स्पर्धेला सामोरे जायचे झाले तर अपयश पदरी पडण्याची शक्यता अधिक असते. केंद्रीय लोकसेवा आयोगही आपल्या विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना पूर्वतयारी, पूर्वनियोजन करण्यास वेळ मिळावा म्हणून दरवर्षी आपल्या वार्षिक स्पर्धा परीक्षांचा कार्यक्रम जाहीर करीत असते. यंदाही २०११ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक युपीएससीने जाहीर केले आहे.
भारतीय नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०११
दिनांक १९ फेब्रुवारी २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली असून दिनांक २१ मार्च २०११ ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे.
पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांस बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा- दि. १ ऑगस्ट २०११ रोजी किमान २१ व कमाल ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी सवलत).
पूर्व परीक्षा- पूर्व परीक्षा दिनांक १२ जून २०११ रोजी घेण्यात येईल.
स्वरूप
प्रश्नपत्रिका-१ - *गुण-२००, *वेळ- दोन तास
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारताचा इतिहास आणि राष्ट्रीय चळवळ, भारताचा आणि जगाचा भूगोल, ज्यात भारताच्या आणि जगाच्या भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोलाचा समावेश आहे. भारतीय राज्यव्यवस्था आणि शासन, ज्यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतराज व्यवस्था, जनतेसाठीचे धोरण, हक्क आणि अधिकारविषयक मुद्दय़ांचा समावेश आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास- ज्यात शाश्वत विकास गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण धोरणे आदींचा समावेश आहे. पर्यावरणीय परिस्थिती, जैव विविधता आणि हवामान बदल आदी विविध घटकांचा समावेश राहील. सामान्य विज्ञान या घटकावर प्रश्न विचारले जातील.
प्रश्नपत्रिका-२ - *गुण-२००, *वेळ-दोन तास
कॉम्प्रिहेन्शन (आकलन), इंटरपर्सनल स्कील्स (कम्युनिकेशन स्कील्स), लॉजिकल रिझनिंग आणि अ‍ॅनॅलिटिकल अ‍ॅबिलिटी (तर्कशास्त्र आणि विश्लेषण क्षमता), डिसिजन मेकिंग अ‍ॅण्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (निर्णयक्षमता आणि समस्यांचे निवारण), जनरल मेन्टल अ‍ॅबिलिटी (सामान्य मानसिक क्षमता), बेसिक न्यूमरसी (ज्यात संख्या आणि त्यांचे संबंध, संख्या परिमाण इत्यादी तर डेटा इंटरप्रिटेशन (तक्ते, आलेख, सारणी आदी). बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन या दोघांचा अभ्यासक्रम स्तर दहावीचा असेल. इंग्रजी भाषा आणि आकलन कौशल्ये (दहावीचा स्तर).
परीक्षा केंद्रे - १. मुंबई २. औरंगाबाद ३. नागपूर ४. पणजी (गोवा)
भारतीय वन सेवा परीक्षा २०११
या परीक्षेसाठी दिनांक १२ मार्च २०११ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून दिनांक ११ एप्रिल २०११ ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत असेल.
पात्रता- पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूविज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांपैकी किमान एका विषयातील पदवी किंवा कृषी किंवा वन किंवा अभियांत्रिकी शाखेतील विद्यापीठाची पदवी. या नमूद केलेल्या विषयांपैकी कोणत्याही विषयात पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवार या परीक्षेस बसू शकतात. मात्र, लेखी परीक्षेत पात्र झाल्यानंतर त्यांना पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
वयोमर्यादा- दि. १ जुलै २०११ रोजी किमान २१ व कमाल ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी सवलत).
परीक्षा पद्धती- लेखी परीक्षा (पारंपरिक पद्धती) १४०० गुण आणि ३०० गुणांची मुलाखत होईल. भारतीय वन सेवा परीक्षेला बसण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला ४, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराला ७ संधी मिळतात. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना या संधींची कोणतीही मर्यादा नसते. दिनांक ९ जुलै २०११ पासून लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा १० दिवस चालेल.
मिळणारी पदे - सहायक वनसंरक्षक, जिल्हा वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, प्रधान वनसंरक्षक, महानिरीक्षक (वने), केंद्रीय मंत्रालयात पर्यावरण सचिव आदी पदे.
स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेंटिसेस परीक्षा-२०११
या परीक्षेची जाहिरात दिनांक १९ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध होणार असून १८ एप्रिल २०११ अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल.
पात्रता- मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री यापैकी एका विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठ, शिक्षण परीक्षा मंडळाची प्रथम किंवा द्वितीय क्षेणीतील इंटरिजिएट (१०+२) परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा- दिनांक १ ऑगस्ट २०११ रोजी किमान १७ व कमाल २१ वर्षे.
परीक्षा पद्धती- ६०० गुणांची लेखी परीक्षा असेल त्यात सामान्य क्षमता चाचणी (इंग्रजी, सामान्यज्ञान, मानसशास्त्रीय चाचणी), (फिजिक्स-केमिस्ट्री) आणि मॅथेमॅटिक्स हे तीन प्रत्येकी २०० गुणांचे पेपर्स असतील. व्यक्तिमत्व चाचणी-२०० गुणांची असेल.
मिळणारी पदे- भारतीय रेल्वेच्या यांत्रिकी (मेकॅनिकल) विभागात वर्ग १ ची पदे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा-२०११
या परीक्षेसाठी दिनांक ९ एप्रिल २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार असून २१ मार्च २०११ अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत असेल.
पात्रता- आर्मीसाठी एनडीए- १०+२ पॅटर्ननुसार १२ वी परीक्षा उत्तीर्ण. एअरफोर्स आणि नावल विंग्जकरिता एनडीए आणि नावल अकादमीतील १०+२ (एक्झिक्युटिव्ह ब्रॅन्चकरिता) फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन १२ वी परीक्षा उत्तीर्ण. १२ वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, नंतर आवश्यकता वाटेल तेव्हा १२ वी उत्तीर्ण परीक्षेच्या प्रमाणपत्राचा पुरावा त्यांना आयोगाला सादर करावा लागेल.
शारीरिक पात्रता- उंची किमान- १५७.५ सें.मी. (वजन उंचीच्या प्रमाणात असते), एअर फोर्ससाठी- १६२.५ सें.मी. उंची आवश्यक. पायांची उंची ९९ ते १२० सें.मी.च्या दरम्यान असावी. मांडय़ांची लांबी ६४ सें.मी. असावी. बसल्यानंतर उमेदवाराची उंची ८१.५ सें.मी. ते ९६ सें.मी. आवश्यक.
वयोमर्यादा- दिनांक १ जुलै २०१२ रोजी साडेसोळा वर्षे तर कमाल १९ वर्षे पूर्ण.
परीक्षा पद्धती- लेखी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी, शारीरिक पात्रता परीक्षा या तीन टप्प्यांतून निवड केली जाते. दिनांक २१ ऑगस्ट २०११ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०११
दिनांक ३० एप्रिल २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल, तर ३१ मे २०११ अर्ज करण्याची अंतिम मुदत राहील.
पात्रता- इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आयएमए)/ ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (ओटीए)करिता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. नावल अ‍ॅकॅडमीकरिता- फिजिक्स, मॅथेमॅटिक्स विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी. एअरफोर्स अ‍ॅकॅडमीकरिता- फिजिक्स आणि किंवा मॅथेमॅटिक्स विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी.
शारीरिक पात्रता- उमेदवार शारीरिक, मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त, निरोगी असावा. किमान उंची- १५७.५ सें.मी. (वजन उंचीच्या प्रमाणात असते) एअरफोर्ससाठी- १६२.५ सें.मी. उंची आवश्यक. महिला उमेदवारांसाठी उंची १५२ सें.मी. आवश्यक.
वयोमर्यादा- दिनांक १ जुलै २०१२ रोजी इंडियन मिलिटरी अकादमीकरिता १९ ते २४ वर्षे, नावल अ‍ॅकॅडमीकरिता १९ ते २२ वर्षे, एअरफोर्स अ‍ॅकॅडमीकरिता १९ ते २३ वर्षे आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीकरिता १९ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे.
परीक्षा पद्धती- इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, नावल अ‍ॅकॅडमी आणि एअरफोर्स अ‍ॅकॅडमीकरिता इंग्रजी, सामान्यज्ञान, एलेमेंटरी मॅथेमॅटिक्स प्रत्येकी १०० प्रमाणे एकूण ३०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीकरिता इंग्रजी आणि सामान्यज्ञान या दोन विषयाच्या प्रत्येकी १०० गुणांच्या प्रश्नपत्रिका असतील. दिनांक १८ सप्टेंबर २०११ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल.
मुलाखत- इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, नावल अ‍ॅकॅडमी आणि एअरफोर्स अ‍ॅकॅडमीकरिता ३०० गुणांची आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीकरिता २०० गुणांची मुलाखत होईल. ही मुलाखत एसएसबीच्या वतीने घेतली जाईल.
सेंट्रल पोलीस फोर्सेस परीक्षा-२०११
या परीक्षेसाठी २८ मे २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल तर २७ जून २०११ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत राहील.
पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
शारीरिक पात्रता- पुरुषांसाठी १६५ सें.मी. उंची, ८१ सें.मी. छाती न फुगविता आणि वजन ५० किलो असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी १५७ सें.मी. उंची आणि उंचीच्या प्रमाणात वजन असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा- १ ऑगस्ट २०११ रोजी किमान २० व कमाल
३५ वर्षे
परीक्षा पद्धती- ९ ऑक्टोबर २०११ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा ४०० गुणांची असेल. त्यात पेपर १ सामान्य क्षमता व बुद्धिमापन (बहुपर्यायी) २५० तर पेपर- २ निबंध, सारांश लेखन आणि आकलन (पारंपरिक पद्धती)- १५० गुणांसाठी असेल. लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाते. मुलाखत/ व्यक्तिमत्त्व चाचणी ही २०० गुणांची असते.
मिळणारी पदे- केंद्रीय पोलीस दल- सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, शसत्र सीमा बलमध्ये असिस्टंट कमांडण्ट गट ‘अ’- पदावर संधी.
नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०११
पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ही मुख्य परीक्षा २९ ऑक्टोबर २०११ पासून सुरू होईल. ही परीक्षा २१ दिवस चालेल. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो. मुख्य परीक्षा ही पूर्णपणे वर्णनात्मक पद्धतीची असते. या मुख्य परीक्षेत भारतीय भाषा, इंग्रजी भाषा, निबंध, सामान्य अध्ययनाचे दोन पेपर आणि दोन वैकल्पिक विषय असतात. एका वैकल्पिक विषयाचे दोन पेपर्स असतात. असे एकूण नऊ पेपर असतात. मुख्य परीक्षा ही जरी २६०० गुणांची वाटत असली तरी भारतीय भाषा व इंग्रजी या सक्तीच्या विषयांचे गुण गुणवत्ता यादीत धरले जात नसल्यामुळे मुख्य परीक्षा ही फक्त २००० गुणांचीच असते. मात्र, यूपीएससीने निर्धारित केलेले कमीत कमी गुण या दोन्ही विषयांत मिळविणे सक्तीचे असते. या दोन्ही विषयांमध्ये जर परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याचे पुढचे पेपर्स तपासले जात नाहीत. हे दोन्ही विषय वगळता, उर्वरित सात पेपर्सचे एकूण २००० गुण मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातात.
मुलाखत- ३०० गुण उमेदवाराचा दृष्टिकोन, निर्णयप्रक्रिया आणि आत्मविश्वास- संयमाची परीक्षादेखील या मुलाखतीद्वारे केली जाते.
मिळणारी पदे- नागरी सेवा परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना खालील सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात.
अखिल भारतीय सेवा- भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)
केंद्रीय सेवा गट ‘अ’- भारतीय डाक व दूरसंचार वित्त व अर्थसेवा, भारतीय लेखा व लेखापरीक्षण सेवा, भारतीय राजस्व सेवा (सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पाद), भारतीय संरक्षण लेखा सेवा, भारतीय राजस्व सेवा, भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीज सेवा (अतांत्रिक), भारतीय डाक सेवा (टपाल सेवा), इंडियन सिव्हिल अकाऊण्टस् सव्‍‌र्हिस, भारतीय रेल्वे वाहतूक सेवा, भारतीय रेल्वे लेखा सेवा, इंडियन रेल्वे पर्सोनेल सव्‍‌र्हिस, रेल्वे संरक्षण दलामध्ये साहाय्यक सुरक्षा अधिकारी, इंडियन डिफेन्स इस्टेट सव्‍‌र्हिस, भारतीय माहिती सेवा (कनिष्ठ श्रेणी), भारतीय व्यापार सेवा.
गट ‘ब’- आम्र्ड फोर्सेस हेडक्वॉर्टर्स सिव्हिल सव्‍‌र्हिसेस (कक्ष अधिकारी ग्रेड), दिल्ली अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, दमन, दीव आणि दादरा नगर हवेली नागरी सेवा, दिल्ली, अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, दमन, दीव आणि दादरा नगर हवेली पोलीस सेवा, पाँडेचरी पोलीस सेवा.
इंडियन इकॉनॉमिक/ इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस परीक्षा-२०११
दिनांक ३० जुलै २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल तर २९ ऑगस्ट २०११ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल.
पात्रता- भारतीय अर्थसेवेकरिता- इकॉनॉमिक्स, अल्पाइड इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, इकोनॉमेट्रिक्स या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.
भारतीय सांख्यिकी सेवेकरिता- स्टॅटिस्टिकल/ अप्लाइड स्टॅटिस्टिक/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्समधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. (अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र.)
वयोमर्यादा- १ जानेवारी रोजी २१ वर्ष पूर्ण तर ३० वर्षे.
परीक्षा पद्धती- दिनांक ३ डिसेंबर २०११ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा तीन दिवस चालेल. लेखी परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी- मुलाखत या टप्प्यांतून निवड केली जाईल. भारतीय अर्थसेवेसाठी सामान्य इंग्रजी, सामान्य अध्ययन हे प्रत्येकी १०० गुणांचे तर सामान्य अर्थशास्त्र १, २, ३ आणि सामान्य अर्थशास्त्र हे प्रत्येकी २०० गुणांचे अशा एकूण १००० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. भारतीय सांख्यिकी सेवेसाठी सामान्य इंग्रजी आणि सामान्य अध्ययन हे प्रत्येकी १०० गुणांचे तर स्टॅटेस्टिक्स १, २, ३, ४ हे प्रत्येकी २०० गुणांचे अशा एकूण १००० गुणांची लेखी परीक्षा असेल. व्यक्तिमत्त्व चाचणी २०० गुणांची असेल.
मिळणारी पदे- भारतीय अर्थसेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेत निवड झालेल्या उमेदवारांच्या वित्त मंत्रालयांतर्गत विविध कार्यालये, तसेच नियोजन आयोग आदींमध्ये साहाय्यक संचालकांपासून अतिरिक्त सचिव स्तरांपर्यंतच्या पदांवर नियुक्त्या होतात.
भूवैज्ञानिक परीक्षा २०११
दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल. १२ सप्टेंबर २०११ अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत असेल.
पात्रता- जिऑलॉजी/ अप्लाइड जिऑलॉजी किंवा मरिन जिऑलॉजी या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद येथून असोसिएटशिप इन अप्लाइड जिऑलॉजीमधील पदविका किंवा माइनरल एक्स्प्लरेशनमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (GSI करिता) किंवा हायड्रॉजिऑलॉजीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (CGWB करिता)
वरीलपैकी पात्रतेमधील अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना त्याबाबतचा पुरेसा पुरावा अर्जाबरोबर द्यावा लागेल.
वयोमर्यादा- १ जानेवारी २०११ रोजी किमान २१ व कमाल ३२ वर्षे वय पूर्ण.
परीक्षा पद्धती- दिनांक ३ डिसेंबर २०११ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा तीन दिवस चालेल. ७०० गुणांची लेखी परीक्षा आणि २०० गुणांची व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाईल.
मिळणारी पदे- कॅटेगरी ‘अ’- भूवैज्ञानिक (कनिष्ठ) गट ‘अ’- साहाय्यक भूवैज्ञानिक गट ‘ब’- जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया) कॅटेगरी ‘ब’- ज्युनिअर हायड्रोजिओलॉजिस्ट गट ‘अ’, साहाय्यक हायड्रोजिओलॉजिस्ट गट ‘ब’- (केंद्रीय भूजल बोर्ड)
यूपीएससीने जाहीर केलेले हे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक परिवर्तनीय असते. विशेषत: जाहिरात प्रसिद्धी आणि लेखी परीक्षेच्या तारखेत हा बदल होऊ शकतो. या परीक्षांच्या सर्व जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचारमध्ये प्रसिद्ध होतात. तर दर शनिवारी देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्येदेखील आयोगाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. ‘एनडीए’ किंवा ‘सीडीएस’ या संरक्षण सेवेशी संबंधित परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षांसाठी मागासवर्गीयांना वयोमर्यादेत सवलत आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नावल अकॅडमी परीक्षेसाठी महिला उमेदवार पात्र नाहीत. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
एकूणच, यूपीएससीने जाहीर केलेल्या स्पर्धा परीक्षांच्या कार्यक्रमामुळे सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांनी पूर्वतयारी, नियोजन करणे सोपे जाते आणि या पूर्वतयारी- नियोजनाचा परिणाम आपल्याला यशाचा उंचावणारा आलेख पाहताना निश्चितच जाणवतो.
Today, there have been 3 visitors (5 hits) on this page!
 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free