sachinbhandare - शैक्षणिक कर्जासाठी
 

Contact
sachin
time pass
marathi newspaper
websites
Career
=> दहावीनंतरचे डिप्लो
=> शैक्षणिक कर्जासाठी
=> दहावी, बारावी, पदवीधरांसाठी सुरक्षा दलात ह
=> युपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा
=> तरुणांनो, चला, जिंकू या दाही दिशा...
आरोग्य
बँकिंग

शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा

भारतातील खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या रूपाने पैशाची मदत करण्याचा कार्यक्रम आखला आहे ज्यायोगे हे विद्यार्थी तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतील. कोणत्याही कटकटी आणि दिरंगाई न होता हे शैक्षणिक कर्ज मिळावे ह्यासाठी सर्व भारतीय बँकांनी कर्जप्रक्रिया सुलभ केली असून कर्जाची मागणी ऑनलाइन नोंदवण्याचीही सोय केली आहे. अर्थात सर्वच बँकांच्या सर्वच शाखांमध्ये ही सोय सध्या तरी मिळू शकत नसल्याने अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आपला अर्ज शाखेत जाऊनच सादर करावा लागेल.

शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • अर्जदाराचे वय अर्ज करतेवेळी किमान १८ वर्षे पूर्ण परंतु ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदारास प्रवेशपरीक्षा अथवा निवड-चाचणीमार्फत व्यावसायिक/तांत्रिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेला असावा.
  • ही योजना भारतातील तसेच परदेशांतील फक्त मान्यताप्राप्त व्यावसायिक/तांत्रिक अभ्यासक्रमांनाच लागू राहील.
  • सदर विद्यार्थ्यावर परतफेड न केलेल्या इतर कोणत्याही शैक्षणिक कर्जाचा बोजा नसावा.
  • हे कर्ज सदर विद्यार्थ्याच्या राहण्याच्या कायमच्या ठिकाणाजवळ असलेल्या बँक-शाखेद्वारे दिले जाईल.

मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

भारतातील अभ्यासक्रम (सूचक यादी):

  • पदवी अभ्याक्रम: बीए, बीकॉम, बीएस्सी इ.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रम: मास्टर व पीएच् डी
  • व्यावसायिक अभ्यासक्रम: अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुवैद्यक, विधी, दंतवैद्यक, व्यवस्थापन, संगणक इ.
  • इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे मान्यताप्राप्त अथवा एखाद्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नामवंत संस्थेचे संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  • आयसीडब्ल्यूए, सीए, सीएफए ह्यांसारखे अभ्यासक्रम
  • आयआयएम, आयआयटी, आयआयएससी, एक्सएलआरआय, एनआयएफटी, एनआयडी इ. द्वारे चालवलेले तसेच केंद्र / राज्य सरकारांनी स्थापन केलेल्या संस्थांचे अभ्यासक्रम
  • मान्यताप्राप्त संस्थांचे सायंकालीन अभ्यासक्रम
  • पदवी / पदविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम. हे यूजीसी/ सरकार/ एआयसीटीई/ एआयबीएमएस/ आयसीएमआर इ. ची मान्यता असलेल्या कॉलेजांद्वारे तसेच संस्थांमार्फत चालवलेले असावेत.
  • राष्ट्रीय संस्था तसेच इतर नामवंत खाजगी संस्थांनी, आपल्या मुख्य कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊन, चालवलेले अभ्यासक्रम
  • नामवंत परदेशी विद्यापीठांनी, आपल्या मुख्य कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊन, चालवलेले अभ्यासक्रम

टीप -:

  1. एआयसीटीईची मान्यता नसलेल्या तसेच राज्यपातळीवरील विद्यापीठांची मान्यता नसलेल्या संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ह्या योजनेमधून कर्ज मिळू शकणार नाही.
  2. आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्याजदरात सूट देणारी विशेष योजना.

परदेशांतील शिक्षण

  • पदवी मिळवणे: नामवंत विद्यापीठांचे नोकरीभिमुख व्यावसायिक/ तांत्रिक अभ्यासक्रम
  • पदव्युत्तर: एमसीए, एमबीए, एमएस इ.
  • लंडनमधील सीआयएमए अथवा अमेरिकेतील सीपीए, इत्यादींद्वारा चालवले जाणारे अभ्यासक्रम
  • शालेय शिक्षण/ माध्यमिक/ पदवी अभ्यासक्रम/ पदव्युत्तर अभ्यासक्रम/ व्यावसायिक अभ्यासक्रम:अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुवैद्यक, विधी, दंतवैद्यक, व्यवस्थापन, फिजिओथेरेपी, नर्सिंग इ. पीजीडीआरआयएम/ आयसीडब्ल्यूए, सीए, सीएफए / आयआयएम/ आयआयटी/ आयआयएससी/ एक्सएलआरआय/ एनआयएफटी तसेच केंद्र अथवा राज्य सरकारी मान्यता असलेले इतर अभ्यासक्रम. पदवी / पदविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेले इतर सर्व अभ्यासक्रम. हे यूजीसी/ सरकार/ AICTE/ AIBMS/ ICMR इ. ची मान्यता असलेल्या कॉलेजांद्वारे तसेच संस्थांमार्फत किंवा राष्ट्रीय आणि नामवंत खाजगी संस्थांनी चालवलेले असावेत.

कर्जाची जास्तीत जास्त रक्कम

विद्यार्थ्याची गरज, परतफेडीची क्षमता इ. बाबी लक्षात घेऊन बँक जास्तीतजास्त १० लाखांपर्यंत कर्ज देऊ शकते.
भारतातील शिक्षणासाठी कर्जमर्यादा- जास्तीत जास्त रु. १०.०० लाख
परदेशातील शिक्षणासाठी कर्जमर्यादा- जास्तीत जास्त रु. २०.०० लाख

कर्जासाठी भरावयाची बयाणा रक्कम (मार्जिन)

रु. ०४.०० लाखांपर्यंत : काही नाही
रु. ०४.०० लाखांपेक्षा जास्त असल्यास : ५%

कर्जासाठी तारण

रु. ४ लाखपर्यंत : काही नाही
रु. ४ लाखपेक्षा जास्त ते रु. ७.५ लाखपर्यंत: तिस-या पक्षाच्या हमीदाराने दिलेले गहाण तारण
रु. ७.५ लाखपेक्षा जास्त: बँकेला योग्य वाटेल त्याप्रमाणे उचित किंमतीचे गहाण तारण तसेच योग्य तिस-या पक्षाच्या हमीदाराकडून व पुढे मिळणार्या् उत्पन्नामधून कर्जाची परतफेड करण्याबाबत विद्यार्थ्याकडून हमी.

 

टीप:हे तारण विद्यार्थ्याच्या/पालकाच्या/हमीदाराच्या नावावर असलेली जमीन / इमारत/ सरकारी रोखे/ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे रोखे/ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/ किसान विकास पत्र/ एलआयपी/ बँकेतील मुदतठेवी इ. च्या रूपात असू शकते.

कर्ज वितरणाची पद्धत

कर्जाची रक्कम अभ्यासक्रमाच्या वर्षांमध्ये विभागून विद्यार्थ्याच्या प्रगतीवर अवलंबून दिली जायला हवी. पुढील शैक्षणिक वर्षासाठीची कर्जरक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्याने त्याआधीचे वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे त्या संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

कर्जाची परतफेड

परतफेडीबाबत सवलत/मोरेटॉरियम : अभ्यासक्रमाचा कालावधी + 1 वर्षाने अथवा नोकरी मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी परतफेड सुरू करता येते. संपूर्ण कर्ज एकंदरीने 5-7 वर्षांत फेडले जावे अशी अपेक्षा आहे. अर्थात अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार ही मुदत दर बँकेगणिक बदलू शकते.

प्रक्रिया शुल्क

शुल्क घ्यायचे की नाही अथवा किती घ्यायचे ही बाबदेखील बँकेच्या अखत्यारीत असते.

इतर अटी

  • मागणी तसेच गरजेनुसार हे कर्ज टप्प्याटप्प्याने संबंधित संस्थेस किंवा पुस्तके/उपकरणांच्या विक्रेत्यास थेट पुरवले जाते.
  • पुढील सत्रासाठीचा हप्ता मिळण्यासाठी विद्यार्थ्याने त्याआधीच्या सत्राचे मार्कशीट (गुणपत्रिका) सादर केली पाहिजे.
  • संपर्काचा पत्ता बदलल्यास विद्यार्थ्याने / पालकांनी तसे लगेच कळवले पाहिजे.
  • अभ्यासक्रमाची निवड बदलल्यास अथवा तो पूर्ण झाल्यास /मध्येच रद्द झाल्यास /भरलेली फी कॉलेजकडून परत मिळाल्यास /नोकरी लागल्यास अथवा बदलल्यास विद्यार्थ्याने / पालकांनी संबंधित बँक-शाखेस तसे लगेच कळवले पाहिजे.

कर्ज मंजूर करणारी शाखा

अर्जदाराच्या कायमच्या निवासापासून जवळ असलेल्या बँक-शाखेकडून हे शैक्षणिक कर्ज मंजूर केले जाते. परंतु सदर विद्यार्थी ह्या ठिकाणाऐवजी इतरत्र असलेल्या संस्थेत प्रवेश घेत असल्यास ती शैक्षणिक संस्था जेथे असेल त्या ठिकाणच्या शाखेमार्फत (तेथे शाखा असल्यास) कर्ज दिले जाऊ शकते. संबंधित विद्यार्थी, पालक/ स्थानिक पालक (गार्डियन) आणि (लागू असल्यास) हमीदाराने सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी बँक-शाखेस स्वतः भेट देणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • पूर्ण भरलेला अर्ज
  • ह्याआधीच्या उत्तीर्ण परीक्षेची गुणपत्रिका
  • प्रवेश मिळाल्याचा पुरावा, खर्चाची आकडेवारी, अभ्यासक्रमाचा कालावधी इ. चा पुरावा
  • शुल्काची रचना (संबंधित संस्थेचे त्याबाबतचे पत्र)
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • संबंधित विद्यार्थी, पालक/ स्थानिक पालक आणि (लागू असल्यास) हमीदाराच्या ओळखपडताळणीचा पुरावा (पासपोर्ट/ ओळखपत्र/ निवडणूक ओळखपत्र/ पॅनकार्ड इ)
  • निवासस्थानाचा पुरावा (शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र , पासपोर्ट, विजेचे अथवा दूरध्वनीचे बिल किंवा बँकेस चालू शकणार्याप अशा कोणत्याही कागदपत्राची झेरॉक्स कॉपी)
  • हमीदाराची माहिती (कर्जाची रक्कम रु ४ लाखांपेक्षा जास्त असल्यास)
  • कर्जदार तसेच हमीदाराच्या उत्पन्नाचे दाखले
  • पालकांचे संयुक्त जबाबदारीचे (को-ऑब्लिगेशन) निवेदन
  • अर्जदार किंवा त्याच्या पालकांनी इतर कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र
  • बयाणा रक्कम (कर्जाची रक्कम रु ४ लाखांपेक्षा जास्त असल्यास): भारतात शिकणार्यांरसाठी: ५%, परदेशात शिकणार्यांखसाठी: १५%
  • तारण म्हणून ठेवणार असलेल्या मालमत्तेचे कागदपत्र इ. (कर्जाची रक्कम रु ७.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास)
  • तारण वस्तू (आयुर्विमा पॉलिसी. कर्ज घेतेवेळी अशा पॉलिसीची रक्कम – सरंडर व्हॅल्यू – कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असली पाहिजे) /हक्कभाग प्रमाणपत्र/ युटीआयच्या युनिट्सचे प्रमाणपत्र इ. तारण वस्तूच्या मूल्याबाबत बँकेच्या मान्यतापात्र व्हॅल्युअरचे व वकिलाचे मत.

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया

भारतातील खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या रूपाने पैशाची मदत करण्याचा कार्यक्रम आखला आहे व कर्जाची मागणी ऑनलाइन नोंदवण्याची सोय केली आहे. अर्थात सर्वच बँकांच्या सर्वच शाखांमध्ये ही सोय सध्या तरी मिळू शकत नसल्याने अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आपला अर्ज शाखेत जाऊनच सादर करावा लागेल. मात्र असे विद्यार्थी ह्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकतील.

शैक्षणिक कर्जाची मागणी ऑनलाइन नोदवण्यासाठी बँकेच्या नावावर क्लिक करा

 

टीप:अभ्यासक्रमाचा कालावधी व स्वरूपानुसार कर्जाची रक्कम दर बँकेगणिक बदलू शकते. तसेच व्याजदर, प्रक्रिया-शुल्क, परतफेडीची मुदत, तारण व बयाणा रक्कम इ. बाबीही बँकेच्या धोरणानुसार बदलू शकतात.

विविध बँकांची धोरणे, मिळू शकणार्याक कर्जाची रक्कम, बयाणा रक्कम व तारण, परतफेड इ. बाबी समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Today, there have been 1 visitors (2 hits) on this page!
 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free